महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी स्वतः कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते
बोले तैसा चाले । त्याची वंदावे पाउले ॥
अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥
त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनी कर ॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव या मराठी म्हणी प्रमाणे राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्ये कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे विनंती केली आणि नांदेड जिल्ह्यधिकारी राहून कर्डीले यांनी शासन दरबारी मोठे प्रयत्न केले आहे
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्याच्या संदर्भात शासन दरबारी प्रयत्न केले आहे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा करण्यात आला होता परंतु हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदरचा पिक विमा जमा झाला नसल्याने आणि ते तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी राजकीय क्षेत्रात आपले वजन दाखवून दिले आहे
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष तथा पुरोगामी विचाराचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना असे सांगितले होते की सदरच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा येत्या आठ दिवसात जमा होईल असे अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी केली होती
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठवड्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

0 Comments