Header Ads Widget

सिंधी येथे कार्यसम्राट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या कार्यप्रणालीला जनतेचा सलाम : स्वखर्चातून १० लाख रुपयांची विहीर बांधून देणार समस्त गावकऱ्यात समाधान !!

      माधव पवार 
समाजकारण आणि जनसेवा ही केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले सिंधी गावचे भूमिपुत्र तथा ज्येष्ठ समाजसेवक मारोतराव कवळे गुरुजी यांनी गावकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर मोठा निर्णय घेत स्वखर्चातून तब्बल १० लाख रुपये खर्च करून विहीर उभारण्याची घोषणा केली आहे

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

सिंधी गावात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत माता-भगिनींना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे 

अनेकदा पाण्याअभावी दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र गावात पाहायला मिळते. या परिस्थितीची जाणीव ठेवून कवळे गुरुजी यांनी गावातील नागरिकांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार केला आहे 

गावातील विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गावाच्या पाणीप्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गावातील महिलांना आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी ऐकून कवळे गुरुजी भावूक झाले आहे 

आपल्या गावातील बांधवांची होत असलेली हालअपेष्टा पाहवत नसल्याने त्यांनी कोणतीही शासकीय मदत अथवा निधीची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातून १० लाख रुपयांची विहीर बांधून देण्याचा निर्णय जाहीर केला.

या बैठकीस समिती अध्यक्ष नारायण पाटील कवळे, उपाध्यक्ष दादाराव पाटील पुयड, सदस्य लिंग्राम पाटील कवळे, मारोतराव विठ्ठलराव कवळे, गोविंद मारोतराव पुयड, मधुकर हणमंतराव कवळे यांच्यासह गावातील सर्व कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवळे गुरुजी यांच्या या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे

समाजातील एखाद्या व्यक्तीने आपल्या गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी पुढाकार घेणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.  आहे 

विशेष म्हणजे, त्यांनी घेतलेला हा निर्णय केवळ आर्थिक मदतीचा नसून गावाशी असलेल्या आत्मीयतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श नमुना मानला जात आहे.

गावाच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या कवळे गुरुजी यांनी या उपक्रमातून "गाव माझे, जबाबदारी माझी" हा संदेश दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दलचा विश्वास आणखी दृढ झाला असून समाजातील इतर सक्षम व्यक्तींनाही प्रेरणा मिळणार आहे 

सिंधी गावाच्या इतिहासात पाणीटंचाईच्या प्रश्नावर घेतलेला हा निर्णय एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून भविष्यात अनेक कुटुंबांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे

जनतेच्या अडचणी ओळखून त्यावर तत्काळ कृती करणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने लोकनेते ठरते, याची प्रचिती कवळे गुरुजी यांच्या या लोकहितकारी निर्णयातून पुन्हा एकदा आली आहे.

Post a Comment

0 Comments