हिमायतनगर. तालूक्यातील पळसपूर ३३ के व्हि उपकेंद्र सबस्टेशन अंतर्गत विद्यूत महावितरण कार्यालयाकडून विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. वारंवार विनंत्या अर्ज करूणही विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरीकांच्या भावना अतिव झाल्या आहेत. खोळबंलेला विज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा महावितरण कार्यालयाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना तालूका अध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर, चांदराव वानखेडे, विठ्ठलराव गायकवाड ,शंकर गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता मंगेश बोरगावकर भोकर यांना पत्राद्वारे दिला आहे.
कार्यकारी अभियंता कार्यालय भोकर यांना दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की, पळसपूर येथील सबटेशन मधून वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहे. महावितरण कंपनीकडून आठ तासाचे भारनियमण व भारनियमना व्यतिरीक्त विज पुरवठा खंडीत होत असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय होत नाही. शालेय विद्यार्थ्याबरोबर शेतकर्याना या महावितरणच्या सुलतानी कारभाराचा त्रास होत आहे. वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष वेधून या ठिकाणचा विज पुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी नागोराव शिंदे,चांदराव वानखेडे, विठ्ठलराव गायकवाड यांनी गावकरी नागरीकांच्या वतीने केली असून,तातडीने कार्यवाही न झाल्यास महावितरणच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला आहे.

0 Comments