पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्याची केवायसी कंप्लेंट असताना सुद्धा बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे नांदेड जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी लक्ष दिले तर शेतकऱ्याच्या बँक खात्यात हप्ते जमा होतील अशी पेक्षा शेतकऱ्यानी केली आहे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दर वर्षी सदरच्या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या थेट बँक खात्यात प्रत्येक चार महिन्याला २००० हाजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे आवाहन केले होते
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला जवळ पास ७ वर्षे पूर्ण झाली असली तरी या सदरील योजनेचे हप्ते शेतकऱ्याची केवायसी झाली नाही म्हणून हप्ते बंद करण्यात आले परंतु शेतकऱ्यानी केवायसी करण्यासाठी सेतू केंद्रावर जाऊन चौकशी केली असता केवायसी कंप्लेंट असल्याचे दिसून येत आहे
मुख्यमंत्री नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू होऊन ३ वर्षे झाली आहेत या योजनेचे एक ते दोन हप्ते पडले आणि केवायसीच्या नावाखाली सदरचे हप्ते ही बंद करण्यात आले आहेत
सदरची योजना ही सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आली असली तरी या सुद्धा योजनेचे वयोवृद्ध शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले असल्यामुळे शेतकरी राजाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे
नांदेड जिल्हाचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शेतकऱ्यांना पीक विमा जसा तात्काळ मिळवून दिला आहे
तशाच पद्धतीने वयोवृद्ध शेतकऱ्यांचे पंतप्रधान सन्मान योजनेसह मुख्यमंत्री नमो योजनेचे रखडलेले सदरील योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी काहीतरी उपाय योजना करावेत अशी मागणी शेतकरी गटातून करण्यात येत आहे

0 Comments