Header Ads Widget

शेतकऱ्यांना पिक विमा मिळून देण्याच्या संदर्भात वेळोवेळी बातम्यच्या माध्यमातून प्रशासनाच्या लक्षात आणून देणाऱ्या पत्रकारांचे मोठे योगदान - नागोराव शिंदे -

      नागोराव शिंदे 
सन २०२५ वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि पीक विमा कंपनीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर केला होता परंतु काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या हक्काची रक्कम ही जमा करण्यात आली होती

परंतु अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा झाला नसल्यामुळे जिल्हातील पत्रकारानी पीक विम्याच्या संदर्भात वेळोवेळी बातम्याच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित करून प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन पीक विमा मिळत नसल्याचे लक्षात आणून दिले आहे 

ह्या नांदेड जिल्ह्यातील पत्रकाराचे मोठे योगदान असून वर्तमान पत्रात ऑनलाईन बातम्या लावून पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होई पर्यंत बातम्या प्रकाशित केले आहे 

अशा दमदार पत्रकारानी लेखणी चालविल्यामुळे प्रशासन जागी झाले असल्याचे हिमायतनगर जेष्ठ पत्रकार नागोराव शिंदे यांनी म्हटले आहे 

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी वर्तमान पत्रासह ऑनलाइन बातम्यांच्या माध्यमाची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे 

Post a Comment

0 Comments