Header Ads Widget

नायगावच्या पंचायत समिती घरकुल विभागतील अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार व सावळा गोंधळ : गटविकास अधिकारी नावालाच !!

       माधव पवार 
नायगावच्या पंचायत समिती घरकुल विभागतील अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार व सावळा गोंधळ होत असल्यामुळे सदरचे गटविकास अधिकारी नावालाच की काय असा प्रश्न जन सामान्य माणसाला भेडसावत आहे 

नायगावच्या पंचायत समिती कडे नांदेड जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जास्तीचे लक्ष देण्याची गरज आहे 

खरे तर नायगाव पंचायत समितीचा कारभार म्हणजे राम भरोसे झाला असल्यामुळे पंचायत समितीच्या घरकुल विभागा कडे कोणाचे लक्ष नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्याचा मन मानी कारभार वाढला आहे 

सदरच्या पंचायत समिती कार्यालयातील बऱ्याच पैकी लोकांचे फोन बंद येतात काही कर्मचाऱ्याचे फोन चालु असुन ही ते उचलत नसल्यामुळे गोरगरीब लोकांचे प्रश्न कसे मार्गी लागतील या कडे कोणता अधिकारी लक्ष देईल का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे 

गेल्या पाच ते सहा महिन्या पासून या पंचायत समिती घरकुल विभागातील यंत्रणा सर्व विस्कळीत झाली असल्यामुळे त्यांचा फटका इतरांना बसत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments