Header Ads Widget

हिमायतनगर पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी बसविला गुन्हेगारीला आळा !!

       नागोराव शिदे
हिमायतनगर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून शहरासह परिसरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राहिली आहे. त्यांच्या कडक आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे हिमायतनगर शहरासह ग्रामीण खेडे गावातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसला आहे 

नागरिकां मध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. 

पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नियुक्तीनंतर हिमायतनगर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलिसांची वाढलेली उपस्थिती, रात्रीची कडक गस्त आणि टवाळखोरांवर तात्काळ केली आहे 

कारवाई यांमुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात हिमायतनगर पोलिसांना मोठे यश आले आहे.केंद्रे यांनी केवळ कायदेशीर कारवाईवर भर न देता, हिमायतनगरमधील सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ केला आहे

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात असून त्यांचा हा कार्यभार हिमायतनगरमध्ये असाच पुढे सुरू राहावा, अशी जाहीर अपेक्षा आता जनतेमधून व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments