Header Ads Widget

जि. प प्रा.शिक्षक वर्ग मतदार यादी च्या कामात गुंतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम जिल्हाधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी सदरचे काम ग्रामसेवका कडे देण्यात यावे !! मागणी !!

             माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळे कडे लक्ष देण्याची गरज भासत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अगोदर शिक्षकाची संख्या कमी व वर्ग जास्त असल्याने व मतदार यादीचे काम शिक्षकाकडे लावल्याने सोपविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी मतदार यादीचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाकडे देण्या ऐवजी तलाठी व ग्रामसेवका कडे दिल्यास सदरचे मतदान यादीचे काम सुरळीत होईल असे पालकांतून बोलल्या जात आहे 
मतदार यादीचे काम तलाठी व ग्रामसेवका कडे तात्काळ दिल्यास शिक्षकांचे लक्ष सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे राहील असे सदरच्या विद्यार्थ्यांच्या पालकातून बोलल्या जात आहे 
नायगाव तालुक्यासह इतर तालुक्यात सुद्धा सदरील मतदार याद्यांचे काम शिक्षकाकडे दिले असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर चांगलाच परिणाम होत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 

तालुक्यासह इतर तालुक्यातील मतदार यादीचे काम तलाठी व ग्रामसेवकाकडे दिल्यास ते सदरचे काम सुरळीत होईल ते सुरळीत करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवकाला प्रशिक्षण देण्यात यावे व मतदार यादीचे पूर्ण करून घ्याव्यात असे ही सदरच्या पालकातून बोलल्या जात आहे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला मतदार यादी पूर्ण करण्याच्या संदर्भात काम सोपविल्यामुळे सदरील शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र स्पष्ट खेड्यापाड्यात दिसून येत आहे 

शिक्षक वर्ग मतदार यादीचे काम पूर्ण करावे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे हा महत्त्वाचा प्रश्न शिक्षकाला चांगलाच भेडसावत आहे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग जास्त शिक्षक कमी अशी अवस्था असताना सुद्धा शासनाने शिक्षकाकडे मतदान यादीचे काम सोपविल्याने शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात मतदान यादीच्या कामात गुंतल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे



Post a Comment

0 Comments