Header Ads Widget

नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन सुपर पॉवर आयपीएस अधिकाऱ्यांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा !!

              माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची बदली पुणे येथे नुकतेच झाली असल्यामुळे परत एकदा नांदेड जिल्हासाठी सुपर पावर आयपीएस पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे 
नांदेड शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सुपर पॉवर आयपीएस निलभ रोहन यांनी पदभार स्वीकारल्याच्या नंतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

नूतन पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी सुद्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करतील अशी जन्य सामान्य अपेक्षा व्यक्त केली जात आहे 

जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात जयंती सोहळा असो दुर्गादेवी असो गणेशोत्सव असो आणि कोणते ही धार्मिक उत्सवाच्या कार्यकाळात कडक बंदोबस्त लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे 

Post a Comment

0 Comments