हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी,वटफळी पोटाशिवारात मान्सून पुर्व पावसाने व वादळी वाऱ्यासह झालेल्या सौरव ऊर्जा च्या नुकसानीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून वटफळी येथील शेतकरी संजाबाई मारोतराव वानखेडे शेत सर्वे नंबर 30/3 या गटात शेतकऱ्याने आपल्या शेतात कष्टाने पैसे जमा करून शक्ती कंपनीच्या सोलार पॅनल ची उभारणी केली पण दि.5 /5/2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलार पॅनल चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी शक्ती सोलार एनर्जी कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोलार पॅनल चा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान झालेल्या सोलार पॅनल ची दुरुस्ती करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

0 Comments