राज्यात गुटखा बंदी असताना सुद्धा सदरचा गुटखा खेड्या पाड्यात कुठून येतो जर राज्यातल्या दळभद्री सरकारने गुटखा कंपनीला जर शील ठोकली तर सदरचा गुटखा खेडा पाड्यापर्यंत पोहोचू शकत नाही व गुटखाबंदीचे कागदी घोडे नाचण्याची आवश्यकता भासत नाही असे सदरच्या जन सामान्य माणसांचे मत आहे
सदरील राज्यात गुटखा बंदी वरच ताव मारण्या पेक्षा ज्या देशी दारूमुळे गोरगरीब कुटुंबाचे संसार उध्वस्त होत असताना सुद्धा या राज्यातले दळ भद्री सरकार दारूबंदी करण्याचा निर्णय घेताना दिसून येत नसल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत
या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याच्या संदर्भात जनतेला आव्हान केले परंतु या देशातील देशी दारू बंद करण्यासाठी सदरचे पंतप्रधान मुग गिळून बसले की काय असा प्रश्न जन सामान्य माणसाला पडला आहे
राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे जनसामान्य माणसाच्या हितासाठी कसल्याच प्रकारचा योग्य निर्णय घेत नसल्याने अनेक समस्याला जनसामान्य माणसाला सामोरे जावे लागत आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या काही पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद अवस्थेत दिसून येत आहेत
सदरच्या सरकारच्या कार्यकाळात गॅसची टंचाई शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नाही केवायसी च्या नावाखाली लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात आले मजुरांच्या हाताला काम नाही सर्व ग्रामीण भागात बेरोजगारांना काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ या दळभद्री सरकारच्या कार्यकाळात आली आहे

0 Comments