नायागांव तालुक्यातील मौजे वंजारवाडी येथील रहिवासी असलेले व एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कुंटुर तांडा येथील कार्यरत कर्मचारी कै. रावसाहेब गंगाराम वाघमारेवय ५५ वर्षे रा. वंजारवाडी यांचे अल्पशा आजाराने दिनांक १ जून २०२६ रोजी २ वाजता दुःखद निधन झाले आहे
तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवासी असलेले गोपीनाथ गंगाराम वाघमारे एकनाथ गंगाराम वाघमारे व ग्रामसेवक प्रकाश गंगाराम वाघमारे यांचे बंधू तर विठ्ठल रावसाहेब वाघमारे आणि राजेश रावसाहेब वाघमारे यांचे ते वडील ( पप्पा ) होते
कै.रावसाहेब गंगाराम वाघमारे हे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व होते त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे
हृदयस्पर्शी संदेश:"
आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आज दिनांक १ जून २०२६ रोजी हरवला आहे. बाबा ( पप्पा ) तुम्ही फक्त एक मार्गदर्शक नव्हता, तर आमचे संपूर्ण जग होता. तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधी ही भरून येणार नाही ईश्वर तुमच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत
आज दिनांक १ जून २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता वंजारवाडी येथे अंत्यसंसार करण्यात येणार आहे
आठवणींना उजाळा देणारा संदेश:"बाबा, तुम्ही मला दिलेल्या आठवणी आणि शिकवलेली मूल्ये माझ्या सोबत कायम राहतील. तुमच्या छत्र छायेखाली घालवलेला प्रत्येक क्षण आमच्या साठी अमूल्य आहे
वंजारवाडी येथील कै रावसाहेब गंगाराम वाघमारे त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी, नातवंडे नातेवाईक व मित्र परिवार असा मोठा परिवार आहे

0 Comments