Header Ads Widget

अहिल्यादेवी होळकरांचा 28 वर्षाचा सलग राज्य कारभार एक जागतिक रेकॉर्ड : बालाजी पेटेकर !!

नायगाव फास्ट न्यूज :-:-
सर्व जातीधर्मीयांसाठी शांततेचे, सुरक्षितेचे आणि वैभवशाली राज्य कसं करावं,खाजगी मालमत्तेतून रयतेसाठी विकास उपयोगी काम करून 28 वर्षाच सुराज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. हा सलग 28 वर्षाचा राज्यकारभार म्हणजे एक जागतिक रेकॉर्डस आहे असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक बालाजी पेटेकर खतगावकर यांनी केले. मनुर (बामणी) ता. धर्माबाद येथील पुण्यश्लोक मातोश्री लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून वैभवशाली होळकरशाही या विषयावर ते बोलत होते.सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर चौक येथे पिवळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर गावभर तरुणाने भव्य अशी मोटरसायकल रॅली काढून मातोश्रींना अभिवादन केले.
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक मनूर येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणरोड सर  हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्माबाद पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. सदाशिव भडीकर साहेब  हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री हेबाडे सर मुख्याध्यापक बामणी, पिराजी ऊरेकर सर हे उपस्थित होते. यावेळी वकृत्व स्पर्धा असे उपक्रम आयोजित केले होते.यावेळी जयंती मंडळातर्फे घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत प्रथम सुनिता कवडेकर, द्वितीय श्रावणी आणि तृतीय लक्ष्मी जिंकले यांनी यश संपादन केले.या वकृत्व स्पर्धेत 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागेश्वर कवडेकर शंकर जिंकले संदीप भंडारे,अनिल जिंकले, सचिन निरगुडे,मनेष जिंकले, यांच्यासह समाजातील युवा तरुण कार्यकर्ते व जेष्ठ मंडळींनी प्रयत्न केले.या कार्यक्रमास महिला पुरुष व गावातील सर्व धर्मीय समाजाची उपस्थिती प्रामुख्याने दिसून आली.या कार्यक्रमाचे आयोजन युवा मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री एकनाथ जिंकले सर यांनी केले तर उपस्थित आमचे आभार गावच्या पोलीस पाटील सौ.अनुसया जिंकले  यांनी मानले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.या कार्यक्रमासाठी सर्व तरुण युवकांनी विशेष पुढाकार घेतला....

Post a Comment

0 Comments