Header Ads Widget

घुंगराळा येथील कला क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकार श्रीधर उर्फ बाळू पांचाळ यांचे दुःखत निधन !! अंत्यविधी उद्या !!

             माधव पवार 
नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेलेले व 
घुंगराळा येथील रहिवासी असलेले आणि कला क्षेत्रात  उत्कृष्ट कलाकार म्हणून त्यांची ओळख होती असे कलाकार कै.श्रीधर उर्फ बाळू गोपीनाथ पांचाळ यांचे दिनांक २९ मे २०२६ रोजी दुःखत निधन झाले ते मृत्यू समयी ३५ वर्षाचे होते 

हे अतिशय वेदनादायी सत्य आहे लहान मुलांच्या निरागस डोळ्यांतून जेव्हा बाबांच्या आठवणीने अश्रू वाहतात तेव्हा तो आघात संपूर्ण कुटुंबासाठी असह्य असतो मुलांच्या मनाला धीर देण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सर्वांनी त्यांच्या सुखा दुःखात सहभागी होण्याची आहे 

जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले गोपीनाथ पांचाळ यांचे चिरंजीव कै. श्रीधर उर्फ बाळू गोपीनाथ पांचाळ यांच्यावर दिनांक ३० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता घुंगराळा येथे करण्यात येणार आहे 

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील कै. श्रीधर उर्फ बाळू गोपीनाथ पांचाळ यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा त्यांचा परिवार असून त्यांच्या दुःखत निधना बदल घुंगराळा नगरीवर शोक काळा पसरली आहे 


Post a Comment

0 Comments