Header Ads Widget

महिलांना दिवस चांगले येथील "अस "वाटल आणि परत एकदा गॅस विना बाईच मुंडक चुलीत घुसल !! वारे राज्य कर्ते !! -

      माधव पवार 
महिलांना दिवस चांगले येथील वाटल आणि परत एकदा गॅस विना बाईच मुंडक चुलीत घुसल असल्यामुळे ग्रामीण भागात महिला वर गेल्या साठ ते सत्तर वर्षातील दिवस एकदा परत आले असल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करत असताना त्यातून निघणारा लाकडाचा धूर महिलांच्या डोळ्याला हानिकारक ठरत आहे 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील लोकांना उन्हातानाच जाऊन रात्रीची व सकाळची चूल पेटविण्यासाठी कडाक्याच्या उन्हात लाकडे शोधून आणावे लागत आहे 

राज्यातले दळभद्री सरकार गॅसची होत असलेला तुटवडा सुरळीत करण्यासाठी कसल्याच प्रकारचे प्रयत्न करत नसल्याने महिलातून व जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे 

सदरच्या निष्क्रिय सरकारच्या कार्यप्रणालीवर जनता संताप व्यक्त करीत असताना सुद्धा सदरचे निष्क्रिय सरकार कसल्याच प्रकारचा गॅस च्या बाबतीत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याने सदरच्या महिला वर्गावर सकाळी व संध्याकाळी स्वयंपाक करण्यासाठी व लाकूड पेटवण्यासाठी चुलीत मुंडके घालून फुंकावे लागत आहे 

सदरच्या निष्क्रिय सरकारच्या कारभारामुळे जनसामान्य माणूस हैरान होताना दिसून येत असून सदरचे महिला वर्ग आंघोळीला सुद्धा पाणी तापवण्यासाठी लाकडांचा उपयोग करत असल्याने  व जाळ करत असताना महिलांचे डोळे लाल होऊन त्यांच्या डोळ्या मधून पाणी गळत आहे 

Post a Comment

0 Comments