नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यापासून लग्न सोहळ्याचा धुमधडाका होत असल्यामुळे सदरच्या कार्यक्रमां मध्ये जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन रुई बु पार्टीच्या माध्यमातून वंदन जिजाऊ साहेब व शिवरायाना करण्यात येत आहे
सदरील शुभ मंगल प्रसंगी जिजाऊ साहेबांसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टी मौजे बु या सदर गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांना अनेक ठिकाणी बोलावण्यात आले होते
लग्न सोहळ्याच्या शुभ मंगल प्रसंगी सदरील जिजाऊ नंदन दोन स्वर संगीतच्या माध्यमातून पहिल्या प्रथम माँ साहेब जिजाऊ यांच्यासह शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करूनच कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे
सदरील लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात अभंग गवळणी त्याच बरोबर खंडोबा गीत लग्न सोहळ्यातील गीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे गीत जिजाऊ साहेबांचे गीत असे विविध प्रकारचे गीत गायनाच्या माध्यमातून सादरी करण केल्या जात आहे

0 Comments