Header Ads Widget

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा धाडसी कारवाया करत कौतुकास्पद कामगिरी बजावत असल्याने पोलीस अधिकाऱ्यासह पोलिसांना सलाम !!

              माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षम बनली असल्यामुळे जिल्ह्यातील दमदार पोलिस अधिकारी दमदार कारवाया करत सदरच्या प्रकरणाचे सर्जिकल स्ट्राइक केले आहे 

पोलीस अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील पोलिसांचे कौतुकास्पद कामगिरी बदल त्यांच्या कर्तव्याला जनतेतुन सलाम केला जात आहे 

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम म्हणून पोलीस खात्यात ओळख असलेले व परिचय असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी तीक्ष्ण हत्यारांचा साठा साठवून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन सर्जिकल स्ट्राइक केल्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे 

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सुद्धा अवैध धंद्याला आला बसविण्यासाठी व सदरचे धंदे बंद करण्यासाठी मोठे प्रयत्न चालू केले असल्यामुळे त्यांच्याही कार्यप्रणालीवर जनता समाधान व्यक्त करीत आहे 

       !!  पोलिसांचे कौतुक का करावे !!
पोलिसांचे कौतुक करणे आवश्यक आहे कारण ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, चोवीस तास समाजाची सुरक्षितता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत 

पोलिसा कडून गुन्हेगारी रोखणे आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी पोलीस दल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करणे गरजेचे आहे 

सुरक्षितता आणि संरक्षण: पोलीस दिवसा-रात्री समाजाच्या रक्षणासाठी तैनात असतात, ज्यामुळे नागरिकांना निर्भयपणे जगता येत आहे 

कर्तव्यनिष्ठा आणि त्याग: अनेकदा कौटुंबिक सण, सुट्ट्या बाजूला ठेवून पोलीस बंदोबस्तात व्यस्त असतात पोलिसांचे कर्तव्य चांगल्या पद्धतीने निभावत आहेत 

आपत्कालीन मदत: नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा दंगलीसारख्या कठीण प्रसंगात पोलीस सर्वात आधी मदतीसाठी धावून येतात अशा पोलिसांना सलाम करण्याची गरज आहे

गुन्हेगारीवर नियंत्रण: गुन्हेगारांना पकडणे आणि कायदेशीर कारवाई करून समाजात भीतीमुक्त वातावरण निर्माण करणे शांतता अबाधित ठेवण्यासाठी  पोलीस महत्त्वाची भूमिका बजावत आहे 

Post a Comment

0 Comments