नांदेड जिल्ह्या मध्ये गेल्या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठया प्रमाणात अतोनात नुकसान झाले असल्यामुळे या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना पिक विमा म्हणून सव्वा आठशे कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली असली तरी नायगाव तालुक्यातील घुंगराळा सर्कल मधील शेतकऱ्यांना अद्याप ही पीक विम्याची रक्कम एक ही रुपया जमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आला नसल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हैराण झाला आहे
नायगाव तालुक्यातील घुंगराळा सर्कल हे पिक विम्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पुरोगामी विचाराचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले यांना मेसेज द्वारे घुंगराळा सर्कल मधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज पाठवण्यात आला आणि एका क्षणात उत्तर त्यानी मॅसेज द्वारे पाठवून दिले आहे
जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले यांनी मेसेजची दखल घेत तात्काळ रिप्लाय देऊन सदरचा पिक विमा मिळवून देण्यासाठी एस असा शब्द लिहून पाठविला असल्यामुळे आता घुंगराळा सर्कल मधील शेतकऱ्यांना पिक विमा लवकरच मिळणारच असल्याचे चित्र दिसत आहे

0 Comments