Header Ads Widget

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फुसका बार ना महिना टू महिना हप्ता ना वाजा जागा !!

            माधव पवार 
राज्यात महिलांच्या मताचे परिवर्तन करून घेण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर काढून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी चालवलेली शकल काही काळ टिकली परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा फुसका बार वाजत असल्याचे स्पष्ट चित्र सध्यातरी दिसत आहे 

राज्यातले दळभद्री सरकार हे नको त्या योजना काढुन जन सामान्य माणसाची दिशाभूल करून मताचे परिवर्तन करून घेते महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अमलात आली असली तरी त्या योजनेची अंमलबजावणी सरळ सरळ होत नाही अनेक लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात आले आहेत 

सदरचे हे दळभद्री सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे ना लाडक्या बहिणीचे कैवारी नसल्यामुळे शेतकऱ्यांसह महिला वर्गात मोठा संताप व्यक्त केला जात आहे 

सध्याच्या परिस्थितीमध्ये गॅस टंचाई बँकेत पैशाची टंचाई पेट्रोलचे अनेक पेट्रोल पंप पेट्रोल असल्यामुळे बंद अवस्थेत दिसून येत आहेत 

सध्याच्या परिस्थिती मध्ये राज्यात बुवाबाजीचे प्रकार जास्तीत जास्त वाढल्यामुळे सदरचे प्रकारने सरकारचे लक्ष वेधून घेतले असून सदरच्या सरकारला ना गोरबरीब जनतेची फिकीर ना शेतकऱ्यांची फिकीर लाडक्या बहिणीची फिकीर सदरचे सरकार हे राज्यात दळभद्री कारभार चालवत असल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे 

Post a Comment

0 Comments