Header Ads Widget

उपविभागीय पोलिस अधिकारी बिलोली यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांच्या कडून इज्जतगाव गोदावरी पात्रात सर्जिकल स्ट्राइक !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथे उपविभागीय पोलिस अधिकारी बिलोली यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांच्या कडून इज्जतगाव गोदावरी पात्रात सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले असून या विभागात  तहसील प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या नजरा चुकून गोदावरी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्या वर छापा मारून सदरचे साहित्य उद्ध्वस्त करण्यात आल्याचे छायाचित्र दिसत आहे 



तालुक्यातील इज्जतगाव येथे गोदावरी पात्रातून नायगावच्या महसूल प्रशासनासह संबंधित पोलिसांच्या गजरा चुकून बोटीच्या साह्याने रेतीचा उपसा करणाऱ्यावर बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी दमदार सर्जिकल स्ट्राइक केले आहे 
कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी कुंटूर पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळल्या पासून अनेक मोठ मोठाल्या कारवाया करून अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणून सोडले आहे 

Post a Comment

0 Comments