नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा सव्वा आठशे कोटी रुपये आल्याचे सांगण्यात येते परंतु नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल मधील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते त्या शेतकऱ्याला पिक विम्याच्या माध्यमातून तुट पुंजी मदत कधी मिळणार असा सवाल शेतकरी गटातून केला जात आहे
म्हणे नांदेड जिल्ह्यासाठी सव्वा आठसे कोठी पीक विमा आला म्हणे तर बरबडा सर्कल साठी कधी मिळणार ? असा सवाल शेतकरी गटातून केला जात असला तरी या राज्यातल्या दळभद्री सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे
राज्यातले व केंद्रातले सरकार शेतकऱ्याचा पुळका करतात आणि शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजना व नमो शेतकरी योजना शासनाने राबवली असली तरी हजारो शेतकऱ्यांचे सदरचे चार महिन्याला तूट पुंजी मदत म्हणून मिळणारे दोन हजार रुपयाचा हप्ता अनेक शेतकऱ्याचे बंद करण्यात आले आहेत
त्याच बरोबर राज्याtl दळभद्री सरकार हे लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याला दीड हजार रुपये निवडून तिच्या तोंडावर देण्याची योजना अमलात आणून त्या सुद्धा शेकडो लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात आले आहेत
तालुक्यातील बरबडा सर्कल मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना सुद्धा या सर्कल मधील शेतकऱ्याला एक ही रुपयाचा पीक विमा पडत नसल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत असून बाजूच्या सर्कलमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होत असल्याची चर्चा चालू आहे

0 Comments