Header Ads Widget

राज्यातले दळभद्री सरकार म्हणजे राज्याला लागलेली किड ? सत्तेत बसून राज्याचे केले वाटोळे !!

       माधव पवार 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सत्तेत बसलेले दळभद्री सरकार म्हणजे या महाराष्ट्राला कायमची लागलेली कीड असल्यामुळे या राज्या मध्ये दररोज काही ना काही गंभीर घटना घडत असल्यामुळे सदरचे सरकार हे राज्याला खिळ खिळ करून सोडले आहे

या दळभद्री सरकारच्या कार्यकाळात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह संतांच्या भूमीमध्ये दैनंदिन घटनांमध्ये वाढ होत असून या राज्यात खून बलात्कार महिलावर होणारे अत्याचार काही करता थांबत नसल्याने त्या राज्यात ते सरकार नेमके करते तरी काय असा जनसामान्य माणसातुन प्रश्न विचारला जात आहे 

हे राज्यातले सरकार निवडूनुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजने सारख्या योजना काढून महिला वर्गांचे मोठ्या प्रमाणात मत मिळून घेतले आहे 

या राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊन सत्तेत बसले सदरचे सरकार हे लाडकी बहीण आवडीने म्हणत असले तरी या राज्यातल्या महिना कुठे सुरक्षा नाही अथवा त्यांना सुरक्षित पणे वावरता येत नाही महिलेच्या सुरक्षेसाठी हे दळभद्री सरकार प्रयत्न कधी करणा असा प्रश्न पडला आहे 

या राज्यात या लाडक्या बहिणी वरच दैनंदिन अन्याय अत्याचार होत असताना सदरचे सरकार चांगलेच मूग गिळून बसले असून या सरकारच्या कार्यकाळात गॅस सिलेंडरचा तुटवडा अधून मधून पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नाही भयंकर महागाई अनेक लाडक्या बहिणीची पैसे बंद झाले शेतकऱ्यांना अद्याप विमा पडलेला नाही अशा अनेक समस्या ह्या राज्यात उद्भवत आहेत 

Post a Comment

0 Comments