नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कसल्याच प्रकारचा अवैध धंद्याला थाराच नसल्याचे ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत्या १४ एप्रिल पासून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण पंचेचाळीस गावे असल्यामुळे या सदरच्या गावामध्ये खेड्यापाड्यात कोणी पोलिसांच्या नजरा चुकवून अवैध धंदा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा कडक इशारा ही सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिला आहे
ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी अवैध धंद्याला आळा बसविण्यासाठी कुंटूर पोलीस सक्षम असल्याचे ही सपोनि विशाल पाटील भोसले यांनी सांगितले आहे

0 Comments