नायगाव तालुक्यातील कोलंबी दरेगाव येथील विद्युत वितरण कंपनी युनिट मांजरम येथील विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता यांच्या मनमानी कारभारामुळे या सदरच्या दरेगावात गेल्या दोन दिवसा पासून अंधारच अंधार असल्यामुळे नागरिकात संतापाची लाट पसरली असून सदरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे
तालुक्यातील कोलंबी दरेगाव येथे गावातील लोकांनी बिले भरले नसल्यामुळे या गावचा विद्युत पुरवठा खंडित केला असल्याचे गावकऱ्यातून सांगण्यात येत असले तरी या विभागाचे आमदार व खासदार नेमके करतात तरी काय असा सवाल जन सामान्य माणसातून केला जात आहे
नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांचे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे लक्ष नसल्यामुळे सदरच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सध्याच्या परिस्थिती मध्ये वाढला असल्याचे दिसून येत आहे
कोलंबी दरेगाव येथील नागरिकांना गावात अधांर कोट असल्यामुळे सदरील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असून विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे व मनमानी कारभारामुळे सदरच्या गावातील विद्युत पुरवठा खंडित केला असल्याचे गावकऱ्यातून स्पष्ट बोलले जात आहेत

0 Comments