नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सदरची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे
शिव छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर ते एक महान विचारवंत आणि आदर्श प्रशासक होते ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचे विचार आज ही तरुणांना धैर्य स्वाभिमान स्त्री सन्मान आणि प्रजेच्या कल्याणाची प्रेरणा देतात अशा महान महापुरुषांची जयंती कुंटूर पोलीस ठाण्यात साजरी करण्यात आली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्यासह ठाण्यातील सर्वच पोलीस अधिकारी बीट जमादार त्याच बरोबर महिला पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचारी त्याच बरोबर होमगार्ड ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली आहे

0 Comments