हिमायतनगर :- हदगाव महामंडळ आगाराची बस आता हिमायतनगरहून पळसपूर, डोल्हारी मार्गे आता ढाणकीला जाणार असून या बससेवेचा प्रवाश्यांनी लाभ घ्यावा. असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे यांनी केले आहे.
या मार्गावर महामंडळाची बससेवा सुरू करावी, म्हणून नागोराव शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले होते. वारंवार या विभागाकडे त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. हि बाब आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या कानावर घातल्यानंतर आमदार महोदयाने बसडेपो मॅनेजरशी थेट संवाद साधून या प्रकरणी सुचना केल्या. आमदार कोहळीकर यांच्या सुचनेनुसार व नागोराव शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून ही बससेवा सुरू झाली आहे. दि. ९ सोमवारी या मार्गावरून बससेवा सुरू झाली. तेव्हा पळसपूर बसस्टाॅपवर चालक, वाहकांचे स्वागत गावकर्यानी केले आहे. यावेळी हदगाव आगारप्रमूख श्री धर्माधिकारी यांच्यासह हिमायतनगरचे नियंत्रक श्री दळवी यांचे अभार या भागातील नागरिकांनी मानले आहेत. दरम्यान् या बससेवेचा फायदा या भागातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनीं व अन्य प्रवाश्यांना होणार असून, या महत्वपूर्ण बससेवेचा प्रवाशी नागरीकांनी लाभ घ्यावा. असे अवाहनही नागोराव शिंदे पळसपूरकर यांनी केले आहे.
यावेळी बसचालक एस. के. जटाळे, वाहक के. जी. मोळके, मारोतराव पवार, गंगाराम इडूळकर, देवराव वानखेडे, चांदराव वानखेडे, नागोराव शिंदे, आनंदराव बोंबीलवार, लक्ष्मण मांजरे, माधव सुकळकर, दत्ता बोंबीलवार,विठ्ठलराव गायकवाड, बारकू माने,संदिप कदम, राजू वानखेडे, सतीष वाडेकर, संजय वाडेकर आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती.

0 Comments