Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बेकायदेशीर विना परवाना देशी दारू विकणाऱ्यावर सपोनि विशाल पाटील भोसले यांची कारवाई - दोन लाख तीस हाजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त !!

           माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बेकायदेशीर विना परवाना देशी दारू विकणाऱ्यावर सपोनि विशाल पाटील भोसले यांची कारवाई - दोन लाख तीस हाजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याला आला बसविण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असताना सुद्धा संबंधित पोलिसांच्या नजरा चुकवून बेकायदेशीर विनापरवाना देशी दारूची विक्री करीत असलेल्या देशी दारू अड्ड्यावर कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी बेधडक कारवाई चालू केली आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पंचेचाळीस गावातील कुठे पोलिसांच्या नजरा चुकून बेकायदेशीर देशी दारूची विक्री करत असतील तर त्या ठिकाणी बेधडक छापे मारून सदरचे देशी दारूचे अड्डे उध्वस्त करीत आहेत 

कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या कार्यकाळात मोठमोठाल्या कारवाया करून अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणून सोडले आहेत 

उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली श्याम पानेगावकर यांच्या सुचने नुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मलिकार्जुन कारामुंगे, यांच्यासह ठाण्याचे पोहेका आर टी पवार पोहे का मोहनराव कंधारे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील हंबर्डे, गजानन चापलकर, बुद्धेवाड  यांनी सदरची कारवाई पार पडल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments