नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गोदावरी पात्रातील अवैध रेती उपसा करून साठवून ठेवणाऱ्या वाळू माफीयावर पोलिसांचा धाडसी छापा - १६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त रेती उपसा रेती उपसा करणाऱ्या बोटीवर अग्नी तांडव सदरच्या कारवाईत दिसत आहे
नांदेड जिल्हाचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील भोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा प्रशांत शिंदे, यांचे सुचने नुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह पोहेका पांचाळ पोलीस कॉन्स्टेबल असिफ, आणि कांबळे यांनी सदरची कारवाई केली आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्हात अवैध धंद्याला आळा बसविण्यासाठी मोठे प्रयत्न गेल्या वर्षापासून करत असताना सुद्धा ठाण्यांतर्गत पोलिसांच्या नजरा चुकून गोदावरी पात्रातून रितीचा अवैध उपसा करणाऱ्या रेती माफीयावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी छापे पे छापा मारत असल्याने त्यांच्या कर्तव्याला सलाम केला जात आहे

0 Comments