Header Ads Widget

जाज्वल्य नागनाथ मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये संत जनाई मुक्ताई हरिपाठ महिला मंडळ कामारवाडी यांच्या हरीपाठाचा घेतला भाविक भक्तांनी आनंद

नागोराव शिदे पळसपुरकर  
हिमायतनगर. तालुक्यातील मोजे पळसपुर येथे 21 तारखेपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आज पाचव्या दिवशी दिनांक 17 रोजी सायंकाळी संत जनाई मुक्ताई हरीपाठ महिला मंडळ कामारवाडी यांच्या हरीपाठाचा कार्यक्रम कमलबाई वानखेडे यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले आहे या हरीपाठाने पळसपुर नगरीतील भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले असल्याचे दिसत होते या महिला मंडळाच्या हरीपाठाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक भक्त पळसपुर येथील नागनाथ मंदिराच्या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते  या वेळी संत जनाई मुक्ताई हरीपाठ महिला मंडळाच्या अध्यक्ष सिंधुबाई कांबळे, उपाध्यक्ष कविता सुनील कलाने, सचिव सीमा कलाने ,सदस्य स्वाती कलाने, सागर कलाने, मीरा सोळंके ,सुजाता पाळजकर, कविता पाळजकर, सरस्वती भिंगोरे, चंद्रकला मनमंदे ,नंदा सुभाष कलाने, मथुरा विजय गजभारे ,बेबीताई बाबुराव वानखेडे ,छाया रावते, करवंदा देवराये
अनुसया ठोंबरे, पुष्पा कांबळे, मंदा कलाने, चतुराबाई गजभारे ,नारायण भिंगोरे ,उत्तमराव कलाने ,जिल्हा सचिव वारकरी साहित्य परिषदेचे वैजनाथ महाराज ठोंबरे कामरवाडीकर ,प्रमेश्वर कलाने, सुभाष कलाने ,यांनी हरिपाठ सादरीकरण करून येथील महिला पुरुष भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते वरील महिला मंडळाच्या हरीपाठाचा कार्यक्रमाचे नागनाथ देवस्थान कमिटी च्या वतिने स्वागत करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments