नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डीजे मुक्त शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले असून जर कोणी कायद्याचे उलंघण केल्यास त्यावर थेट पोलीस कारवाई करण्यात येईल असे ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि विशाल पाटील भोसले यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ४५ गावे आहेत या सदरच्या गावामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे
अशा महापुरुषांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमां मध्ये डीजे मुक्त जयंती साजरी करून महत्त्वाचा संदेश शासनाला देण्यासाठी जयंती मंडळाच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे ही कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी केले आवाहन आहे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर ते एक महान विचारवंत आणि आदर्श प्रशासक होते ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे
माँ साहेब जिजाऊ यांचे सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार आज ही तरुणांना धैर्य स्वाभिमान स्त्री सन्मान आणि प्रजेच्या कल्याणाची प्रेरणा देतात अशा महान महापुरुषांची जयंती कुंटूर पोलीस ठाण्यात साजरी करण्यात आली आहे

0 Comments