राजकीय पुढारी आणि पत्रकार या दोघांतील नाते समन्वय असल्यामुळे व नेता आवडीचा असल्यामुळे पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यासाठी हादगाव हिमायतनगर विधान सभा मतदार संघाचे विद्यमान बाबुराव कदम कोहळिकर यांनी पत्रकार दर्पण दिनानिमित्त पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर यांचा स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला आहे
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील रहिवासी असलेले नायगाव फास्ट न्यूजचे विशेष तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे यांचा हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबुरावजी कोहळीकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये शाल व श्रीफळ देऊन पत्रकार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला आहे
नायगाव फास्ट न्यूजचे विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे हेच सामान्याचे प्रश्ना बरोबर समाज हिताच्या व विकासात्मक बातम्या ऑनलाईन असो की पेपर वर्तमानपत्राच्या माध्यमातून असो बातम्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा घडवण्याच्या संदर्भात बातम्या प्रकाशित नेहमी करीत आहेत
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबुरावजी कोहळीकर यांनी पत्रकारांच्या बाबतीत सन्मानपूर्वक सत्कार व पत्रकारांच्या समस्या ऐकून घेतात अशा विद्यमान आमदारांच्या हस्ते पत्रकार नागोराव शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
यावेळी विकास पाटील देवसरकर, ज्ञानेश्वर पुठेवाड, संतोष पाटील ,गोवरव दाजी खडकिकर,दिलिप डोणे,सातव यांच्या सह हिमायतनगर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

0 Comments