माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत ककार्यालय मरवाळी / कोपरा येथे राज्यातील महिला सरपंच अभ्यास दौरा येथे येताच ग्रामपंचायत कार्यालयासह गावकऱ्याच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत केले आहे
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी कोपरा येथे दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी पंजाब राज्यातील महिला सरपंच सौ.छायाताई केशवराव पवळे यांच्यासह गावकऱ्यानी त्यांच्या पंजाब राज्यातील अभ्यास दौऱ्यातील महिला वर्गाचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे
मरवाळी चे ग्राम पंचायत अधिकारी श्री सोनसळे यशदा पुणे येथील अधिकारी श्री डोंगरे ग्राम पंचायत अधिकारी शेख साहेब प स नायगाव गावातील भरपूर महिला व सरपंच सौ छाया केशवराव पवळे पाटील यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने हळदी कुंकू ने स्वागत केले
नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी / कोपरा ग्रामपंचायत कार्यालय येतील पंचायत समिती नायगांवचे विस्तार अधिकारी जाधव , पं. स.चे ग्रामसेवक आदी यावेळी उपस्थित होते
कार्यक्रमांमध्ये विशेष म्हणजे आपल्या नांदेडची शान श्री गोविंदसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून हिंदी चादर कार्यक्रम ची माहिती दिली आहे
महाराष्ट्र राज्य चे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अकाली निधन झाले त्यामुळे मोठा स्वागताचा कार्यक्रम रद्द करण्यात आला व श्रद्धांजली वाहिली
मरवाळीच्या सरपंच सौ.छायाताई केशवराव पवळे उपसरपंच कैलास मारोतीराव वजीरगवे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावातील महिला व नागरिक खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी कोपरा या गावच्या विद्यमान महिला सरपंच व ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य यांनी गावच्या विकासाला गती देण्याचे काम केलेआहे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत व गावातील विविध विकास कामे पाहण्यासाठी दौरा ६० महीला सरपंच पंजाब राज्य सहाय्यक गटविकास अधिकारी श्री जाधव कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळा येथे उत्कृष्ट चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला . उपस्थितचे आभार सर्व महिला सरपंच यांनी केले
ग्राम पंचायत कार्यालय मरवाळी, कोपरा येथील उपसरपंच श्री कैलास वजिरगावे सर्व सदस्य यांनी आलेल्या पाहुण्यांचे व गावकरी यांचे आभार मानले

0 Comments