Header Ads Widget

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंदे अवैध देशी दारू बंद करण्याची राबवलेली मोहीम ग्रामीण भागात यशस्वी एस पी च्या कार्यप्रणालीवर जनता खूष !!

      माधव पवार 
नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंदे अवैध देशी दारू बंद करण्याची राबवलेली मोहीम ग्रामीण भागात यशस्वी एस पी च्या कार्यप्रणालीवर जनता समाधान व्यक्त करीत असून सदच्या धंद्याचा बिमोड करण्यासाठी ग्रामीण भागातील ठाणे प्रमुखानी सुद्धा जोरदार मोहीम चालू ठेवली आहे

जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी व गुटखा बंदी मोहीम चालू केले असल्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्या मोहिमेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे 

जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांना दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने ठाणे प्रमुखाने सदरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेशाचे पालन करीत अवैध धंदे  बंद करण्यासाठी संबंधित ठाणे प्रमुख पुढाकार घेतल्यामुळे खेड्यापाड्यातील अवैध देशी दारूचे अड्डे आता ठाणे प्रमुखच्या वतीने उध्वस्त करण्यात येत आहेत

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारण्याच्या पूर्वी जिल्ह्यात धंद्याला ऊत आला होता परंतु जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यांच्या नंतर जिल्ह्यात कुठेच अवैध धंदे चालू देणार नाही असा पवित्रा पोलीस अधीक्षक यांनी घेतल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंदे अवैध देशी दारू बंद करण्याची राबवलेली मोहीम ग्रामीण भागात यशस्वी एस पी च्या कार्यप्रणालीवर जनता खूष आहे

Post a Comment

0 Comments