Header Ads Widget

आता तुम्हीच सांगा दादा : बरबडा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तगडे पुढारी असल्यामुळे खरंच उमेदवारी कोणाला देणार ?

      माधव पवार 
राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पक्षात मोठ्या विश्वासाने काम करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी व वसंत पाटील सुगावे यांच्यात बरबडा जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी हे दोघे ही तगडे पुढारी आपल्या हक्काच्या पक्षाकडे मागणी करत आहेत 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट निवडणुकीच्या संदर्भात हे दोघे ही पुढारी आपल्या सौभाग्यवतीला तिकीट मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या तरी दिसत आहे 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाची आता खरं सांगा दादा आता उमेदवारी कोणाला देणार आहात ? हा महत्त्वाचा प्रश्न सध्या तरी ग्रामीण भागातील जनतेला भेडसावत आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट हा अतिशय महत्त्वाचा ठरत असल्यामुळे या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तगडे पुढारी आहेत 

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तगडे पुढारी एक दिलीपराव धर्माधिकारी  बरबडेकर व दुसरे वसंत पाटील सुगावे घुंगराळेकर हे एकाच पक्षाचे असल्यामुळे व एकाच गटातील असल्यामुळे व दोघांनाही पक्षात सारखेच पद असल्यामुळे मग आता सांगा दादा तुम्ही खरंच कोणाला तिकीट देणार ? आहात हा महत्त्वाचा प्रश्न चर्चेला जात आहे 


Post a Comment

0 Comments