नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयासह समस्त गावकऱ्यानी गावात दिवाबत्तीच्या रोषणाईत गावकऱ्याचे दैवत असलेल्या श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने सज्ज झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिली आहे
घुंगराळा येथे श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने दिवाबत्तीच्या रोषणाईसह समस्त गावकरी सज्ज : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांची माहिती !!
तालुक्यातील घुंगराळा येथील श्री खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्ताने आज पासून सुरुवात होणार असल्याने सदरील यात्रेसाठी सरपंच उपसरपंच ग्राम पंचायतचे सदस्य व सर्व अधिकारी व पदाधिकारी आणि समस्त गावकरी श्री खंडोबा रायाची यात्रा यशस्वी करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे आहे
घुंगराळा येथील श्री खंडोबा रायाची यात्रा म्हणजे माळेगाव यात्रेच्या नंतर ही यात्रा दुसऱ्या क्रमांकाची असल्यामुळे या यात्रेसाठी समस्त गावकरी श्री खंडोबा रायांचा गजर करीत असतात त्याच निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही यात्रा चांगल्या पद्धतीची करण्यासाठी समस्त गावकरी आज पासून सज्ज झाले आहे
श्री खंडोबारायाच्या यात्रेच्या निमित्ताने ह्या गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येत असते तशाच पद्धतीने या ठिकाणी कुस्त्याचा जंगी फड ही गावकऱ्यांच्या वतीने भरविला जाते श्री खंडोबारायांचा गजर होत असताना ह्या गावात भंडाराची मोठ्या प्रमाणात रस्त्याने उधळण केली जाते असे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे

0 Comments