Header Ads Widget

हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक शिवसेना ( शिंदे गट ) उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. शिरसाठ यांची जाहीर सभा.

नागोराव शिंदे पळसपुरकर तालुका प्रतिनिधी हिमायतनगर

हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या  निवडणूक उमेदवारांच्या प्रचारारार्थ दि. २५ मंगळवारी सायंकाळी ६ वाजता प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
परमेश्वर मंदिर परिसरात संपन्न होणार असलेल्या प्रचार सभेला प्रमूख मार्गदर्शक म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजयजी शिरसाठ हे उपस्थित  राहणार आहेत.
 व तसेच सभेला माजी खासदार तथा विधानपरिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची ही प्रामूख्याने उपस्थिती राहणार आहे.
 तेंव्हा या प्रचंड जाहीर प्रचार सभेला जास्तीत जास्त संख्येनी मतदार बंधू, भगिनी व नागरीकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय वळसे पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments