गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यामुळे नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटांमध्ये परत एकदा महिला राज येणार असल्यामुळे भावी महिला उमेदवारांचे पतीराज आपल्या सौभाग्यवतीला रिंगणात उभे करण्यासाठी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत असल्याची जोरदार चर्चा ग्रामीण भागात चालू झाली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गणात आपल्या सौभाग्यवतीला सदरच्या निवडणुकीची उमेदवारी मिळावी म्हणून आपल्या पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागत असल्याचे स्पष्ट चित्र बरबडा जिल्हा परिषद गटातून दिसून येत आहे
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थात तोंडावर सदरच्या गटात पक्षप्रवेशाची नुकतीची मालिका चालू झाली असल्यामुळे या गटातून आणखी एक बडा नेता पक्ष बदली करण्याच्या तालात असल्याचे संकेत हळूहळू मिळत आहे
बरबडा जिल्हा परिषद गटात सर्व महिला टॉपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात येणार असल्यामुळे निवडणुकीचा राजकीय आखाडा चांगलाच खमंग होणार आहे

0 Comments