नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने एकता दौड रॅलीचे दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी भारताचे गृहमंत्री तथा लोहपुरुष दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती जयंती सोहळ्याच्या निमित्ताने एकता दौड यांचे आयोजन केले असल्यामुळे ह्या सदरच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सपोनि विशाल पाटील भोसले यांनी केले आहे
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सकाळी सात वाजता एकता दौड याचे आयोजन हे कुंटूर बसस्टँड ते लोकडेश्वर मंदीर वरून परत येऊन जिनिंग सुत गिरणी येथे समारोप करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे
कुंटूर ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सदरील कार्यक्रमाला प्रतिष्ठीत नागरीक, सर्व पत्रकार बांधव, पोलीस भरती व आर्मी भरती सराव करणारे युवक, युवती यांनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे ही आवाहन कुंटूर पोलिसांनी केले आहे

0 Comments