Header Ads Widget

नायगाव तालुक्याला ३६.३८ कोटी निधी मंजूर त्या पैकी३१.४२ कोटी वाटप तर ज्या शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्या कडे कागदपत्र सादर करावेत : महिला तहसीलदार धम्म प्रियाताई गायकवाड यांचे आवाहन !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून ३६.३८ कोटी निधी मंजूर झाले त्यापैकी ३१.४२ कोटी वाटप करण्यात आले आहे 

तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्या कडे कागदपत्र सादर करावेत असे नायगावच्या महिला तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना आवाहन केले आहे

नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार डॉ धमाप्रियाताई गायकवाड यांनी नायगाव तहसीलचा कार्यभार सांभाळले तेव्हा पासून शेतकऱ्यासह जनसामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावत आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या अनुदानाची रक्कम जमा होत नाही व काही तांत्रिक अडचण असल्यास ते दूर करण्यासाठी व सदरची रक्कम मिळून घेण्यासाठी आपल्या संबंधित तलाठ्याकडे आधार कार्ड पासबुक तात्काळ जमा करावेत असे नायगावच्या कर्तव्यदक्षेत तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे  

मुसळधार पावसाने अतिवृष्टी होऊन नायगाव तालुक्यातील अनेक घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या २२८६ कुटुंबांना २२८६००० रु वाटप केले आज पर्यंतच्या काळात कोणत्याही नायगावच्या तहसीलदारानी एवढी मोठी रक्कम घरात गेलेल्या पाण्याबद्दल दिली नाही परंतु नायगावच्या तहसीलदार यांनी सदरची रक्कम सदरच्या कुटुंबियांना मिळून दिली आहे 

त्याच बरोबर नायागांव तालुक्यातील ११ मयत जनावरांना ३२१००० रुपये वाटप केले असल्याची नायागांवच्या तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments