नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बरबडा येथे दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ रोजी काही दिवसात दुर्गा मातेची विसर्जन होणार असल्याने गावात व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सपोनि विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुंटूर पोलीसानी पतसंचलन केले आहेकुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत व खेड्यापाड्यात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सर्वत्र विशेष प्रयत्न करीत आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या कार्यकाळात स्रोत्र शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व बीट जमादार व पोलीस मोठे प्रयत्न करीत आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या खेड्यापाड्यात गेल्या सप्टेंबर महिन्या मध्ये श्री गणरायाचे मोठ्या प्रमाणात शांततेत विसर्जन करण्यात आले होते
त्याच पद्धतीने माता दुर्गा देवीचे सुद्धा शांततेत विसर्जन करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक विशाल पाटील भोसले यांनी गावातील रस्त्याने रूट मार्च काढण्यात आले आहे

0 Comments