नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात माता दुर्गा देवीचे विसर्जन डीजे मुक्त सह व्यसनमुक्तीचा संदेश प्रशासनाला देऊन शांततेत विसर्जन करण्याचे : सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांचे आवाहन केले आहे
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माता दुर्गा देवीची विसर्जन करतेवेळी छोट्या छोट्या मुलाला बाजूला सारून सर्व दुर्गा मंडळाने नेमून दिलेल्या ठिकाणी व वेळेची मर्यादा ठेवूनच माता दुर्गा देवीचे विसर्जन करावे असे सुद्धा कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सपोनि विशाल पाटील भोसले यांनी सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या महिन्यामध्ये सर्व गणेश मंडळाने व जनतेने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून डीजे मुक्त व व्यसन मुक्तीचा संदेश प्रशासनाला देत शांततेत श्री गणरायांचे विसर्जन केले आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नऊ दिवस चालणाऱ्या दुर्गा महोत्सवाच्या कार्यकाळात आजपर्यंत लोकांनी व दुर्गा मंडळाने शांतता धारण करून अंतिम टप्प्यात आले आहे
सध्याच्या परिस्थिती मध्ये नदी नाले सर्वत्र भरून वाहू लागल्यामुळे माता दुर्गा देवीचे विसर्जन करण्याच्या अनुषंगाने पाण्याची पातळी लक्षात घेऊन विसर्जन करण्याचे आवाहन ही सपोनि विशाल पाटील भोसले यांनी केले आहे

0 Comments