Header Ads Widget

कुंटूर पोलीसाच्या आवाहनाला सर्व गणेश मंडळाचा प्रतिसाद डीजे मुक्त श्री गणेशाचे विसर्जन : सपोनि विशाल पाटील भोसले यांची माहिती !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व गणेश मंडळांना ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी नायागांव फास्ट न्यूजच्या ऑनलाईन बातमी मधून डीजे मुक्त श्री गणेशाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला श्री गणेश मंडळाचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावां मधील बऱ्याच पैकी गावातील श्री गणेशाचे डीजे मुक्त विसर्जन करण्यात आल्याची सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे 

कुंटूर पोलीस स्टेशन कुंटूर हद्दी मध्ये ८१ गणेश मंडळांची विसर्जन करणे असल्यामुळे सर्व ठिकाणी जवळ पास ५० कर्मचारी व चार अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले डीजे मुक्त आवाहन केलेले आहे 

ठाण्याच्या हद्दीत त्या प्रमाणे आता पर्यंत सातव्या दिवशी व नवव्या दिवशी झालेल्या गणपती विसर्जना मध्ये गणपती मंडळांनी डीजे मुक्त विसर्जनाचे निर्णय घेतला असल्यामुळे अतिशय शांततेत श्री गणरायाचे विसर्जन होत आहे 

उद्याच्या बंदोबस्ताची तयारी झालेली असून तगडा पोलीस बंदोबस्त कुंटूर पोलीस स्टेशन कडून ठेवण्यात आलेला आहे

कायद्याच्या चौकटीत राहून नियमाचे पालन करून गणपती मंडळांनी आपल्या गणपती मंडळाचे विसर्जन करावे असे आवाहन ही पोलीस स्टेशन कुंटूर कडून  सपोनि विशाल पाटील भोसले यांनी पूर्वी केलेलेच आहे


Post a Comment

0 Comments