Header Ads Widget

नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात डीजे मुक्त गणेश उत्सव करण्याची मोहीम संबंधित ठाणे प्रमुखांनी प्रभावी पणे राबविली !!

       माधव पवार 
नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात डीजे मुक्त गणेश उत्सव करण्याची मोहीम संबंधित ठाणे प्रमुखांनी प्रभावी पणे राबविली असून गणेश विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणजे दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सुद्धा कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत डीजे मुक्त श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे 

जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी यंदा डीजे मुक्त श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठीची मोहीम ग्रामीण भागात प्रभावीपणे रागवली असल्यामुळे कुंटूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणेश मंडळाने डीजे मुक्त गणेशाचे विसर्जन करण्यासाठी निर्णय घेतला आहे 

जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी काढलेली मोहीम व निर्णय डीजे मुक्त ही जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली गेली असल्यामुळे डीजे मुक्त केल्यामुळे लाखो रुपयांची बचत झाली असली तरी डिजे वाल्याच्या व्यवसायावर मात्र पाणी फिरले आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व गावातील गणेश मंडळाच्या अधिकाऱ्याची व पदाधिकाऱ्यांची कुंटूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी घेतली होती या बैठकीत दरम्यान गणेश मंडळांना डीजे श्री गणेशाचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कोणत्या ही गणेश मंडळांनी जर डीजे मुक्त नाही गणेशाची विसर्जन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ही सपोनि विशाल पाटील भोसले यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना यापूर्वी दिला होता 

Post a Comment

0 Comments