Header Ads Widget

पळसपुर नगरीमध्ये डीजे लावून फटाके फोडले आरक्षण विजयाचा जल्लोष -

नागोराव शिदे पळसपुरकर 
हिमायतनगर राज्य शासनाने काढलेल्या जीआरच्या माध्यमातून मराठा समाजाचा आरक्षणा चा प्रश्न निकाली निघाला आहे या निर्णयाचे स्वागत करत मराठा बांधवांच्या वतीने हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथे आज दिनांक 4 रोजी सकाळी 9 वाजता मुंबई  येथुन पळसपुर येथे गावि परत आले असल्याने जल्लोष साजरा करण्यात आला. येथील मराठा आंदोलक 40 ते 50 गेले होते आणि त्यांनी निश्चय केला होता कि जरांगे पाटील जसे बोलले तसे आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असे सांगितले जात होते तसेच झाले कि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्री मंडळाने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करुन उपोषण सोडले त्या नंतर सर्व मराठा आंदोलक आप आपल्या गावी परत आल्याने गावातिल सर्व धर्मियांनी मुंबई येथे गेलेल्या मराठा आंदोलकांचा  ट्रॅक्टर व डीजे लावून पळसपुर नगरित भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक पार पडल्यानंतर येथिल जाज्वल्य नागनाथ मंदिरा समोर मुंबई येथे गेलेल्या मराठा आंदोलंका चा पुष्प हार पेढे भरवुन स्वागत करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन संजय शिंदे, दत्तात्रय कदम,दिगांबर वानखेडे यांनी केले होते सर्व आंदोलन कर्रत्यांचे पळसपुर येथील माता भगिनी व ग्रामस्थांनी आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments