Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याचे प्रकाश तांबोळी व नागोराव पोले यांची सहाय्यक उप निरीक्षक म्हणून पदोउन्नती सपोनि विशाल पाटील भोसले यांनी स्टार !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे प्रकाश तांबोळी व नागोराव पोले यांची सहाय्यक उप निरीक्षक म्हणून पदोउन्नती सपोनि विशाल पाटील भोसले यांनी स्टार लावून अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत 

तालुक्यातील कुंटूर स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बरबडा बिटचे ए एस आय नागोराव पोले यांनी चांगल्या प्रकारे सदरच्या बिटचा कारभार सांभाळत असताना त्याची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे

तसेच कुंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रकाश तांबोळी  यांची सुद्धा शासनाचे नवीन अध्यादेशा नुसार  पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी या दोन्ही पदोउन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना स्टार लावले असून सदरचे हे पोलीस अधिकारी म्हणजे सपोनि यांनी पदभार स्वीकारला तेंव्हा पासून अनेक कर्मचाऱ्यांना पदोउन्नती मिळाली असल्यामुळे सदरचे अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी लक्की ठरले आहे 

ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  विशाल भोसले पोलीस उपनिरीक्षक  कारामुंगे जाधव व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश लोणीकर ठाकूर सोनकांबळे निकम व इतर कर्मचारी यांनी पदोन्नतीचा सत्कार केले आहे


Post a Comment

0 Comments