मो नंबर 9561871019
हिमायतनगर. तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पैनगंगा नदीवर असलेल्या इसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने पैनगंगा नदीकाठच्या आणि नाल्याच्याकाठच्या सर्व शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णतः अडचणीत सापडल्याचे लक्षात घेता शासनाच्या नियमानुसार नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी हदगाव कैलास कांबळे यांच्या सूचनेवरून हिमायतनगर च्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी बी एम चव्हाण यांच्या पथकाने व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट पळसपुर सज्जा मधील पैनगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेत सर्वेक्षणाचे काम जोमाने सुरू करण्यात आले असता पळसपुर येथील सरपंच सौ गंगाबाई लक्ष्मण मांजरे यांनी संबंधित पंचनामा करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकाऱ्यांना सांगितले की सर्वे करताना पैनगंगा नदी काठावरील आणि नाल्याच्या काठावरील एकही शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिला नाही पाहिजे याची दक्षता घ्यावी असे यावेळी सरपंच मांजरे यांनी सांगितले आहे पैनगंगा नदी काठावरील शेतीचा सर्वे करताना ग्राम महसूल अधिकारी डी. जि. सबनवार, कृषी सहाय्यक एच. एल. नंदनवार यांनी पळसपुर सज्जातील पळसपुर या गावापासून झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे सुरुवात केली आहे यावेळी लक्ष्मण मांजरे, तुकाराम देवसरकर,नागोराव शिदे विठ्ठल गायकवाड, निर्वति देवसरकर , प्रल्हाद वानखेडे,जिवन वानखेडे, बाबुराव जाधव, गजानन वानखेडे, पांडुरंग देवसरकर हणुमान वानखेडे, सखाराम वानखेडे , माधवराव देवसरकर,सुकवास बेंद्रे,संजय वानखेडे, दत्ता कोमलवार सचिन जाधव, मारोती बनसोड आनंद माने यांच्यासह शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे

0 Comments