नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे जिल्ह्यात लक्ष डीजे मुक्त श्री गणेशाचे विसर्जन करा - अन्यथा डीजे खेड्या पाड्यात आढळून आल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला असून आता अनेक खेड्या पाड्यातील श्री गणरायाचे शांततेत विसर्जन करण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे
दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वच गणरायाचे विसर्जन होत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्याचा मोठा ताण तणाव असताना सुद्धा खेड्यापाड्यातील गणेश मंडळाकडे व विसर्जना कडे परिपूर्ण लक्ष ठेवूनच आहेत
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात डीजे मुक्त विसर्जन करण्याची संकल्पना यशस्वी केली असून या पुढे सुद्धा कोणत्या ही सार्वजनिक व धार्मिक तसेच महापुरुषांच्या जयंती सोहळ्यासह तसेच दुर्गादेवी उत्सवात सुद्धा डीजे मुक्त पद्धतीने कार्यक्रम झाले पाहिजे हा मुळ हेतू या मागचा आहे
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सदरची संकल्पना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली असून आज पर्यंतच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यासाठी अनेक पोलीस अधीक्षक येऊन गेले आहे
परंतु सदरची डीजे मुक्त ही संकल्पना कोणत्याही पोलीस अधीक्षकांनी काढली नाही ती संकल्पना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी काढली आहे

0 Comments