Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील खेड्यापाड्यात अवैध दारू विक्रीला बिलोलीचे दारू बंदी अधिकारी जबाबदार ?

        माधव पवार 
नायगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यात गेल्या काही वर्षा पासून अवैध देशी दारू विक्री होत असताना सुद्धा बिलोलीचे दारूबंदी अधिकारी वरमाईत मग्न असल्यामुळे प्रत्येक खेड्यापाड्यात अवैध देशी दारूचा सुळसुळाट झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

बिलोलीचे दारूबंदी अधिकारी हे केवळ नावालाच असल्यामुळे दर महिन्याला आपला मलिदा घेऊन जात असतात जर बिलोलीचे दारू बंदी अधिकारी हप्ते घेत नसले तर खेड्यापाड्यात अवैध दारू विक्रेत्यांची मजाल झाली नसती असं सवाल सुज्ञान नागरिकांतून उपस्थित केला जात आहे 

तालुक्यात दारू बंदी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे ठिकठिकाणी अवैध देशी दारू विकली जाते व दारू बंदी अधिकारी बिलोलीच्या सरळ सरळ आशीर्वादामुळे सदरचे अवैध धंदे जिथे पाहावे तिथे देशी दारू विक्री केली जात आहे

बिलोलीचे दारू बंदी अधिकारी हे नावालाच असल्यामुळे अवैध देशी दारूच्या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्याच्या नावाने खापरे फोडले जातात दारू बंद करण्याचा अधिकार दारूबंदी अधिकाऱ्याला आहे 

परंतु अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाला पुढाकार घेऊन कारवाई करावी लागते आहे 

परंतु बिलोलीचे दारू बंदी अधिकाऱ्याच्या मनमानी सरळ सरळ सदरच्या अवैध देशी दारू विक्री करणाऱ्याला खतपाणी घालण्याचे काम दारू बंदीचे अधिकारी करत आहेत 

सदरचे खापर मात्र संबंधित पोलीस ठाण्याच्या नावाने फोडल्या जाते आहे

दारूबंदीचे अधिकारी व कर्मचारी असताना सुद्धा ह्या नायगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यात अवैध देशी दारू कसकाय विक्री केली जाते असा प्रश्न चर्चेला जात आहे


Post a Comment

0 Comments