नायगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यात गेल्या काही वर्षा पासून खुलेआम अवैध दारू विक्री होत असताना बिलोलीचे दारूबंदी अधिकारी का मूग घेऊन बसलेत की काय असा प्रश्न केला जात आहे
बिलोलीच्या दारू बंदी अधिकाऱ्यानी आज पर्यंतच्या कार्यकाळात खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाही का केली नाही असा प्रश्न जनसामान्य माणसातून केला जात आहे
दारू बंदीचे अधिकारी खेड्या पाड्यातील अवैध धंद्याला आळा घालत नसल्यामुळे व कारवाया करत नसल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाला व बीट जमादारांना सदरची अवैध देशी दारू बंद करण्यासाठी मोठे पाऊल उचलावे लागत आहे
संबंधित पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अनेक कारवाह्या केल्या जातात परंतु बिलोलीचे दारू बंदी अधिकारी यांच्या कडून मात्र कसल्याच प्रकारच्या कारवाया केल्या जात नाहीत ही दुर्दैवी बाब आहे
बिलोलीचे दारू बंदी अधिकाe गेल्या अनेक वर्षा पासून खेड्यापाड्यात दारू विक्री होत असताना सुद्धा त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करण्या मागचे कारण काय ? असा ही प्रश्न जनसामान्य माणसातून केला जात आहे
दारू बंदी अधिकाऱ्याच्या हप्ते खोरीला आळा बसल्या शिवाय खेड्यातील अवैध देशी दारू बंद होणे शक्य ? असल्याचे सुद्धा सुज्ञान नागरिकांतून बोलल्या जात आहे

0 Comments