Header Ads Widget

भारत टॅलेंट सर्च बी टी एस परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यामुळे लक्ष्मण संतोष पवार यांना प्रमाणपत्र सह टॉपी मान्यवरांच्या हस्ते प्रदान !!

     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथील विद्यार्थी लक्ष्मण संतोष पवार यांनी भारत टॅलेंट सर्च बी टी एस परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यामुळे लक्ष्मण संतोष पवार यांना भारतीय स्वतंत्र्याच्या शुभ दिनी  प्रमाणपत्र सह टॉपी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे 

तालुक्यातील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा रुई बु चे मुख्याध्यापक राम कोठेवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ  व पदवीधर शिक्षक बासटवार सर शाळेचे सहशिक्षक आकूलवार सर सहशिक्षिका सौ गंदलवाड यांनी विध्यार्थाना चांगले घडविले आहे 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार जीवनाभिमुख शिक्षण देणारे पहिले पाऊल एज्यू मीट अकॅडमी महाराष्ट्र आयोजित भारत टॅलेंट सर्च बी टी एस परीक्षा २०२५ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी लक्ष्मण संतोष पवार यांनी ५२ टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत ४६३ क्रमांक प्राप्त करून यश मिळवले आहे 

विध्यार्थी लक्ष्मण संतोष पवार यांच्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील नातेवाईकासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथील शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे 



Post a Comment

0 Comments